केंद्रीय मानवाधिकार संघटन केंद्राच्या (नवी दिल्ली) वतीने जिल्ह्यातील चार आर.एस.पी. अधिकारी शिक्षकांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

केंद्रीय मानवाधिकार संघटन केंद्र (नवी दिल्ली) च्या वतीने जिल्ह्यातील डॉ. सिकंदर शेख, डॉ. सोमनाथ बोंतले, किशोर सातपुते, तुकाराम हराळ या चार आर.एस.पी. अधिकारी शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. नागपूर येथे राष्ट्रीय मानवाधिकार दिनी उच्चस्तर न्यायाधिश अभिजीत देशमुख यानी कार्यक्रमाचे उद्घाटन केले व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या हस्ते चौघांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुरस्कार्थी शिक्षक डॉ.सिकंदर शेख (नवजीवन विद्यालय दहिगावने ता. शेवगाव), डॉ.सोमनाथ बोंतले (भोजादेवी विद्यालय भोजदरी ता. संगमनेर),किशोर सातपुते (अगस्ती माध्य. विद्यालय समशेरपूर ता. अकोले) व तुकाराम हराळ (चांगदेव विद्यालय नारायणडोह, ता. नगर)  शिक्षण क्षेत्रात देत असलेल्या योगदाना बरोबर जनसेवा व वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी सुरु असलेल्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना या पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस उपधिक्षक महामार्ग सुरक्षा पथकचे (नागपूर) संजय पांडे, मानवाधिकार संघटनचे डॉ. कुमेश्‍वर भगत, फिल्म निर्माते दिपक कदम, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अ‍ॅाड. संजय कुस्तवार, सिने अभिनेते प्रकाश भागवत, अभिनेत्री अश्‍विनी चंद्रकापूरे आदी उपस्थित होते. चारही पुरस्कार्थी शिक्षकांचे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, पदवीधर आमदार डॉ. सुधिर तांबे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, माजी शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष प्रा.महेश पाडेकर आदींसह तालुका समादेशक व जिल्ह्यातील आर.एस.पी. अधिकारी शिक्षकांसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.