केंद्रीय मानवाधिकार संघटन (नवी दिल्ली) च्या वतीने नगरचे डॉ. सिकंदर शेख यांचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

केंद्रीय मानवाधिकार संघटन केंद्र (नवी दिल्ली) च्या वतीने जिल्ह्यातील आर.एस.पी. अधिकारी शिक्षक असलेले डॉ. सिकंदर अजिज शेख यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. नागपूर येथे राष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त उच्चस्तर न्यायाधिश अभिजीत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या हस्ते शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सिकंदर शेख हे दहिगावने (ता. शेवगाव) येथील नवजीवन विद्यालयात शिक्षक असून, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रमशील प्रयोग, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी सुरु असलेले कार्य व सामाजिक कार्याच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस उपधिक्षक महामार्ग सुरक्षा पथकचे (नागपूर) संजय पांडे, मानवाधिकार संघटनचे डॉ. कुमेश्‍वर भगत, फिल्म निर्माते दिपक कदम, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अ‍ॅड. संजय कुस्तवार, सिने अभिनेते प्रकाश भागवत, अभिनेत्री अश्‍विनी चंद्रकापूरे आदी उपस्थित होते.
मा.आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील, मृदा व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. राजश्रीताई घुले पाटील, पदवीधर आमदार डॉ. सुधिर तांबे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, दहिगाव सोसायटीचे चेअरमन शब्बीर शेख, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी हराळ, माजी शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगूणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे, सौ. झगडे, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, शेवगाव विस्ताराधिकारी शैलजा राऊळ, प्र.अधिकारी प्रा. के.वाय. नजन, प्राचार्य अशोक उगलमुगले, प्राचार्य डॉ. शरद कोलते, सरपंच सुभाषनाना पवार, उपसरपंच सूर्यकांत पाऊलबुध्दे, विलासराव लोखंडे, उपप्राचार्या कणसे, पर्यवेक्षक टी.एम. घुले, चेअरमन काकासाहेब घुले, शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, प्रा. महेश पाडेकर, जिल्हा कार्यवाहक संजय भुसारी, कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर काळे, शेवगाव तालुका अध्यक्ष कैलास जाधव, ह.भ.प.मच्छिंद्र पानकर, महेमुद पठाण आदींसह जिल्ह्यातील सर्व आरएसपी अधिकारी, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.