केळी ओतूर येथे शिक्षकाची विस्तार अधिकाऱ्याला मारहाण

अकोला तालुक्यातील केळी ओतूर ग्रामपंचायत कार्यालयात काशिनाथ धोंडीराम सरोदे ( ५२ ) हे पंचायत समितीतील विस्तार अधिकारी शासनाच्या घरकुल योजने संदर्भात काम करीत असताना तेथे लालू महादू वायाळ या शिक्षकाने येत माझ्या आईचे नाव घरकूल यादीतून का वगळले ? असा सवाल करत विस्तार अधिकारी सरोदे यांच्या श्रीमुखात चापट लगावली . विस्तार अधिकारी के . डी . सरोदे यांनी या शिक्षकासह तिघांविरुद्ध शासकीय अडथळा निर्माण कामात केल्याचा गुन्हा अकोले ठाण्यात दाखल केला . ही घटना १० जानेवारीस दुपारी १.३० वाजेच्या सुमारास केळी ग्रामपंचायतीत घडली .

विस्तार अधिकारी सरोदे यांनी फिर्यादीत म्हटले की, केळी ओतूर  ग्रामपंचायत कार्यालयात शिक्षक महादू वायाळ हे इतर तिघांसह ग्रामपंचायत कार्यालयात येऊन माझ्या आईचे नाव घरकूल यादीतून का वगळले ? असा सवाल करून शिवीगाळ केली व तोंडावर मारहाण केली . दत्तात्रय गोविंद वायाळ व सुनील कोंडीबा वायाळ ( दोन्ही रा.केळी ओतूर ) यांनी अंगावर धावून येत शिवीगाळ व दमबाजी केली .