गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस कब्जात बाळगणारा आरोपी जेरबंद

बेलवंडी फाटा येथे विक्री करण्याचे उद्देशाने एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतूस कब्जात बाळगणारा आरोपीला अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून किरण अरुण दरेकर (वय ३३ रा. करंदी, ता. शिरुर, जिल्हा पुणे) याला अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा  व चार जिंवत काडतुस असा एकूण २५ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे आणि विक्री करणा-या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे. त्यांनी दिलेल्या आदेशावरून माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि एक इसम बेलवंडी ते श्रीगोंदा रोडवर साई गार्डन हॉटेलचे समोर बेलवंडी येथे बेकायदेशिररित्या गावठी कट्टा कब्जात बाळगून विक्री करण्याचे करण्याचे उद्देशाने फिरत आहे. ही माहिती मिळाल्याने अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.