गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नगर —गावठी पिस्तुलासह दाेन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी अटक केली आहे .  शरीफ अकबर पठाण ऊर्फ गाेट्या (वय ३०, रा. बस स्टॅन्डच्या पाठीमागे नेवासे) याला अटक केलेल्या गुन्हेगारीचे नाव आहे. या संदर्भात पाेलिस कर्मचारी संदीप दरंदले यांनी फिर्याद दिली आहे. तसेच आरोपीकडून ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी कारवाईत जप्त केला आहे.

शेंडी बायपासजवळ गाेट्या गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली हाेती. कटके यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर सहायक निरीक्षक गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत गाेट्याला अटक केली. त्यावेळी गाेट्या हा शेंडी बायपासकडून डेअरी चाैक एमआयडीसीकडे पायी जात हाेता.