गॊविंद मोकाटे’ला अटक करा.

अत्याचारित पीडितेचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू

अहमदनगर— ४ डिसेंबर 2021 रोजी बलात्कार, लैंगिक शोषण आणि एट्रोसिटीकायद्यांतर्गत गोविंद मोकाटे याच्यावर गुन्हा दाखल होऊन दोन महिने उलटले असताना अजून अटक होत नसल्याने पीडित अत्याचारित विवाहितेने अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

जो पर्यंत या गुन्ह्यातील आरोपी गोविंद मोकाटे याला अटक होत नाही तो पर्यंत उपोषण आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा पीडितेने लेखी निवेदनात दिला आहे.

आरोपी हा राजकीय वजन असल्याने त्याला अजून पर्यंत अटक होत नाही. पोलिसांना तो अजून सापडलेला नाही. राजकीय वजनामुळे त्याला अटक होत नसल्याचे मला वाटत असल्याने आता उपोषण करून न्याय मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पीडित विवाहितेने केला आहे. या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले आहे.