गोविंद मोकाटे याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या माजी पंचायत समिती . सदस्य गोविंद मोकाटे याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे . याप्रकरणी मोकाटे याच्या भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली . त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला . गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध एका महिलेने बलात्कार करून धमकावल्याची फिर्याद दाखल केली आहे . गुन्हा दाखल झाल्यापासून मोकाटे पसार आहे . दरम्यान , एक आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे .

 

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदनामी केल्यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार दोन मोबाइल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला . इमामपूर ( ता . नगर ) येथील मोरया युवा प्रतिष्ठान ग्रूप , तसेच वेगवेगळ्या ग्रुपमध्ये गोविंद मोकाटे व महिलेचा आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केला आहे . मोकाटे याच्या नातेवाईक व मित्रांना व्हिडिओ पाठवून त्याची व कुंटुबाची प्रतिमा मलीन केली असून राजकीय व सामाजिक प्रतिमा मलीन करण्याचे कारस्थान केले , असे फिर्यादीत म्हटले आहे . या गुन्ह्याचा अधिक तपास पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप करत आहेत .