जन आधार सामाजिक संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी.

नगर-जामखेड रस्त्यावर अपघाताचा प्रमाण वाढल्यामुळे तातडीने क्रॉसिंग पट्टे व गतिरोधक बसविण्याची मागणी.

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जामखेड रोड निंबोडी ते चिचोंडी पाटील तसेच आठवड गावापर्यंत नव्याने झालेल्या रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी जण आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, शरद पवार, अमित गांधी, शहानवाज शेख, विजय मिसाळ, किरण जावळे, दीपक गुगळे, विजय शेंगर, रोहित शेंगर, सोहेल शेख, चंद्रकांत पवार आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
नगर-जामखेड रोड हा दुरुस्तीसाठी एनएचएआय यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. मागील वर्षी चांदणी चौक ते कडा गावापर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करून नवीन डांबरी लेयर टाकण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्यांवर वाहने अतिशय जलदगतीने जात असतात व रस्त्याची रुंदी कमी असल्याने आणि वाहनांच्या वेगाने या रोडवर खूप अधिक प्रमाणात निष्पाप लोकांचा जीव जात आहे. निंबोडी गाव ते आठवडपर्यंत खूप  प्रमाणात वळणावळणाचा उतार असणारे रस्ते आहे. तेथे सुमारे 20 किलोमीटर अंतरामध्ये महिन्याभरात किमान दोन-तीन मोठे अपघात झाले आहेत. निंबोडी गावात याच रोडवर अपघात होऊन माजी जिल्हा परिषद सदस्य कै. बापूसाहेब सदाफुले यांची कुठल्याही प्रकारची चूक नसताना फक्त मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाची धडक बसून त्यांचे जीव गेले मुख्य कारण या रोडवर कुठल्याही प्रकारचे क्रॉसिंग पट्टे व गतिरोधक नाही तरी या रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून येत्या 15 दिवसात काम चालू करून तातडीने क्रॉसिंग पट्टे व गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.अन्यथा संघटनेच्यावतीने नगर-जामखेड रोडवर निंबोडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.