जागतिक विमा परिषदेसाठी विनायक नेवसे यांची दुसर्‍यांदा निवड

जगातील विमा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या विमा प्रतिनिधींची अमेरिका (बोस्टन) येथे एम.डी. आर.टी. ही जागतिक स्तरावरची विमा परिषद होत असते. यासाठी नगर मधील विनायक नेवसे यांची या परिषदेसाठी सलग दुसर्‍यांदा निवड करण्यात झाली आहे.
अमेरिकेतील बोस्टन येथे जगातील विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये ही परिषद होत असते. यामध्ये विमा कंपनीचा आढावा व कार्यप्रणालीचा माहिती दिली जाते. एम.डी.आर.टी. मिलियन डॉलर राऊंड टेबल या नावाने ही विमा परिषद होत असते. विनायक नेवसे यांचे शहरासह जिल्ह्यात विमा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य सुरु असून, त्यांची या परिषदेची पुन्हा निवड झाली आहे. नेवसे हे निवृत्त नायब तहसीलदार भगीरथ नेवसे यांचे पुत्र आहेत. त्यांना सदर कार्यासाठी वरिष्ठ शाखाधिकारी निरंजन महाबळ, उपशाखा अधिकारी मकरंद देशपांडे आदींचे मार्गदर्शन लाभले. विमा परिषदेसाठी दुसर्‍यांचा निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.