जिल्हा परिषद आरोग्य विभागातील 32 आरोग्य आरोग्य सेविकांना पदोन्नती, परिचारिका संघटनेच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा सत्कार

कोरोना काळात जिवावर उदार होऊन कार्य करणार्‍या परिचारिकांना खर्‍या अर्थाने न्याय मिळाला -वंदना धनवटे

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील 32 आरोग्य आरोग्य सेविकांना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आरोग्य सहाय्यिका म्हणून पदोन्नती दिल्याची माहिती परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा वंदना धनवटे यांनी दिली.
तीन वर्षाच्या कालावधीनंतर चालू वर्षात कोरोना काळात ग्रामीण भागात सर्वसामान्यांसाठी आधार ठरलेल्या व आरोग्य विभागाचा कणा असलेल्या परिचारिकांना पदोन्नती मिळाली. परिचारिकांना पदोन्नती मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे मुख्यकार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) संदीप कोहिणकर, कार्यालयीन अधीक्षक भगवान गांडाळ, महिला बालकल्याण च्या सभापती शेटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, कैलास डावरे, शिवाजी दराडे, संदीप काळे, परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा वंदना धनवटे, सचिव गीतांजली कोरडे, कांता जाधव, विद्या निराळी, रत्नमाला धिमते, संगीता कचरे, मंजूषा शेळके, छाया नन्नवरे आदी उपस्थित होत्या.


अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिचारिकांचे समुपदेशन करुन सर्वांच्या सोयीनुसार निवड करण्याची संधी उपलब्ध करुन दिली होती. परिचारिकांना पदोन्नती मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांच्या सहकार्यामुळे ही पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मुख्यकार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी पदभार घेतल्यापासून अनेक खडलेले प्रश्‍न मार्गी लागले आहेत. कोरोना काळात जिवावर उदार होऊन कार्य करणार्‍या परिचारिकांना खर्‍या अर्थाने त्यांनी न्याय मिळवून दिला असल्याचे परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा धनवटे यांनी सांगितले. तर परिचारिकांच्या वतीने सर्व अधिकार्‍यांचे आभार मानले.