ट्रॅक्टर चोरणारी टोळी जेरबंद

श्रीगोंदा — येथील शेतकरी झुंबर हरी कोथिम्बिरे  यांचा  ट्रॅक्टर चोरी केल्याचा प्रकरणात पोलिसांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील तीन आरोपींना अटक केली आहे . चोरटयांनी चोरलेला ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे . अतुल विश्वनाथ सुद्रिक , निलेश मछिंद्र सुद्रिक , माउली बबन गवारे अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत . या तिघांनी  २१ जानेवारी रोजी झुंबर कोथिंबिरे यांचा साळवन देवी रोडवरील घरासमोरून ट्रॅक्टर चोरून नेला होता . पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर उपनिरीक्षक अंकुश ढवळे यांचा पथकाने कारवाई केली .