तडीपार गुंडांना अटक .

अहमदनगर येथील वडगाव गुप्ता परिसरात फिरत असलेल्या गुंडाला पकडण्यासाठगी पोलीस गेले होते .दोन गुंडाना पोलिसांनी जागेवरचग पकडले , परंतु एक जण मारुती व्हॅन मधून पसार झाला . त्याला पोलिसांनी गाडी आडवी लावून ताब्यात घेतले . हि घटना रविवारी सायंकाळी चार चा सुमारस घड्ली .
 सागर रावसाहेब चौथे (वय २८ पितळे कॉलनी , नागपूर ) अजमुद्दीन उर्फ नुरा गुलाब सय्यद (वय ३० , रा. गजानन कॉलोनी नवनागापूर  ) संदीप अशोक कासार (वय २८ रा. वडगाव गुप्ता )अशी अटक केलेल्या तडीपार  गुंडांची नावे  आहेत .  सदर गुंडांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे  . पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार , वेगवेगळ्या गुन्ह्यात या तीन  आरोपीं ना १८ महिन्यासाठी तडीपारीची कारवाई केली आहे . तडिपारची कारवाई होऊन देखील हे गुंड वडगाव गुप्ता या ठिकाणी फिरतात .  यांची माहिती स्थानिक गुन्हे  शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना खबरी मार्फ़त मिळाली . स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोपनीय रित्या वडगाव परिसरातील भैरवनाथ मंदिराजवळ दाखल झाले . पोलिसांना पाहून तडीपार गुंडानी पळून जाण्याचा प्रयन्त केला .परंतु पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले , या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाने , पोलीस नाईक सोपान  गोरे , सहायक फौजदार राजेंद्र वाघ , संजय खंडागळे , यांचा समावेश होता .