तहसीलदार साहेब , कार्यालयाचे सार्वजनिक शौचालय स्वच्छ करा,  अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते गांधीगिरी करत स्वच्छता आंदोलन करतील ,काँग्रेसचा तहसीलदारांना  इशारा.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला भेट दिली असता त्या ठिकाणी तहसीलदार यांचा कार्यालयाला लागून असणाऱ्या अभ्यागत साठी असलेल्या सार्वजानिक शौचालयातून  दुर्गंधी येत होती  त्याची गंभीर दाखल घेत  काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा  शिष्टमंडळांनी तहसीलदार उमेश पाटील यांची भेट घेत तहसीलदार साहेब , कार्यालयाचे सार्वजनिक शौचालय स्वच्छ करा अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते गांधीगिरी करत स्वछता आंदोलन करतील , अशा इशाऱ्याचे निवेदन दिले .


यावेळी काँग्रेस नेते माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे,  शहर जिल्हा काँगेस उपाध्यक्ष्य अनंतराव गारदे , काँग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष  प्रवीण गीते, युवा नेते जुबेर सय्यद , युवक काँग्रेस चे स्वप्नील पाठक ,अश शेख आदी कोंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनि  शौचालयाचा स्वच्छतेवरून तहसीलदारांना चांगलेच फैलावर घेतले . नगर शहर व तालुक्यातील नागरिक , शेतकरी  विविध महसूल शी निगडित कामासाठी मोठ्या संख्येने कार्यालयात येतात.  तिथे आल्यावर शौचालयाची दुरावस्था असल्याने त्याचा वापर त्यांना करता येत नाही .त्यांची मोठी कुचंबना  होते  तहसीलदार साहेंबाना तेथून जाताना ते दिसत  नाही का . असा जाब काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसील दारांना  विचारला . शौचालय स्वच्छ केले नाहीं तर  येत्या दोन दिवसामध्ये  स्वःता काँगेस कार्यकर्ते गांधीगिरी आंदोलन करत शौचालय नागरिकांसाठी स्वच्छ करतील  असा इशारा विरोधी पक्ष नेते दशरथ शिंदे यांनी काँग्रेस शिष्टमंडळाचा वतीने तहसीलदार उमेश पाटील याना दिले