कोर्टात केस प्रलंबित असताना कोर्टाचा अवमान करून बळकावला गाळा

जागा परत न मिळाल्यास अजय बोरा यांच्या पत्नी सौ . मंजुषा बोरा यांचा आत्मदहनाचा इशारा

नगर मध्ये कोर्ट कचेऱ्याच्या वादात लिटिगेशन मध्ये असलेली जागा कमी पैशात खरेदी करून बळाचा , गुंडगिरीचा आणि तृतीय पंथियांचा वापर करून बेकायदेशीर पणे जागा खाली करून घेण्याच्या मालिकेत आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे . दहशतीच्या गुंडगिरीच्या व तृतीय पंथीयांच्या मदतीने अजित अनिल औसरकर , सुजित अनिल औसरकर , अनिल औसरकर , अमोल ससे यांनी गेली ४०-४५ वर्ष ताबा असलेली वडिलोपार्जित असलेली अजय अमृतलाल बोरा यांच्या मालकीची जागा बेकायदेशीर पणे खाली करून घेण्यात आली . या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अजय बोरा यांनी तक्रार दिली आहे . या जागेवर सन २००१ पासून अजय अमृतलाल बोरा हे व्यवसाय करीत आहेत . सदर जागेचे प्रकरण हे कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असताना असे बेकायदेशीर कृत्य करून कोर्टाचा देखील अवमान करण्यात आला आहे . याबाबत न्याय मागण्यासाठी अजय अमृतलाल बोरा यांनी नगरच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे . असे असताना देखील दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी या दुकानांमध्ये गव्हाचे बियाणाच्या गोण्यांनी भरलेला ट्रक खाली करण्यासाठी आलेला होता . पण हा माल उतरविण्यात येऊ नये म्हणून या ट्रक ड्रॉयव्हरला बेदम मारहाण करण्यात आली . यात अजय अमृतलाल बोरा यांचा मुलगा ऋषभ अजय बोरा यांना देखील मारहाण झाली . आणि हा ट्रक परत पाठविण्यात आला . असा प्रकार दोन वेळा घडला .
नगरच्या मार्केड यार्ड येथील प्लॉट न . ५२ मध्ये मे . साधना एजन्सी या नावाने प्रोप्रायटर अजय अमृतलाल बोरा यांचा खते बी बियाणे व औषधांचा विकण्याचा व्यवसाय आहे . पिढीजात व्यवसाय  करणारे अजय अमृतलाल बोरा यांचा गाळा रात्रीतून बळजबरीने खाली करून घेण्यात आला . त्यांच्या दुकानातील निम्मा माल रस्त्यावरून टाकून देण्यात आला . यात त्यांचा उरलेल्या मलापैकी अंदाजे ४५ ते ५० लाख रुपयांचा माल चोरून नेला . या घटनेमुळे नगरमधील व्यापारी वर्गात घबराट आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . ही जागा मूळ ताबेदर मालक अजय अमृतलाल बोरा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देणे आवश्यक असतांना देखील पोलिसांनी ही जागा सील केली . ही घटना घडल्या समजताच सकाळी युवानेते सुवेंद्र गांधी यांनी अनेक सहकर्यांन सोबत मार्केड यार्ड येथे जाऊन अजय बोरा यांना धीर दिला व मदत केली . त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली . नगरमध्ये तृतीय पंथीयांना हाताशी धरून अशा प्रकारे जागा खाली करून घेण्याच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . मध्यंतरीच्या काळात पैशाच्या वादातून श्रीरामपूर मध्ये एका व्यक्तीचा तृतीय पंथीयांकडून खून देखील झाला होता . हे प्रकरण ताजे असतांना अजय अमृतलाल बोरा यांच्याबाबत हा प्रकार घडला . रात्रीतून साधना एजन्सीचा बोर्ड काढून ओम साई एजन्सीचा बोर्ड बिनधोकपणे कसा लावण्यात आला . हा प्रकार घडत असताना रात्रीच्या वेळी मार्केट यार्ड येथे प्रवेशद्वारावर रखवाली करणारे व गस्त देनारे सुरक्षा रक्षक काय करीत होते . याची देखील चौकशी होणे आवश्यक आहे . आपणास अंधारात ठेऊन आणि फसवून आपला भाऊ महेश बोरा याने हा बेकायदेशीर व्यवहार केल्याचे अजय बोरा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे आणि न्यायालय गाठले . तेथे रीतसर तक्रार  केल्यानंतर हे प्रकरण न्याय प्रविष्ट झाले . तेव्हा औसरकर यांनी ही जागा खाली करून घेण्याचे काम पुणे येथील मोनिका अशोक पवार आणि तृतीय पंथीय संघटनेची अध्यक्षा काजल गुरु यांना दिले . मग काजल गुरु यांनी आपल्या स्टाईलने  वेळोवेळी स्वतः तृतीय पंथीय सहकर्यांन सोबत येवून बोरा यांना जागा खाली करून घेण्यास धमकावण्यास सुरुवात केली . प्रत्येक वेळी धमक्या आल्यानंतर अजय अमृतलाल बोरा हे रितसर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पुराव्यासह तक्रार करुन मदत मागत होते . पण त्यांच्या मदतीला कोणीच आले नाही . शेवटी ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्री औसरकर यांनी या दुकानीत अवैध घुसखोरी केली व दरोडा टाकला . आणि बोरा यांच्या दुकानातील माल बाहेर रस्त्यावर काढून ठेवण्यात आला . हा प्रकार पाहून अजय बोरा यांच्या पायाखालची जमीनच सरकली . अगोदर देखील बोरा यांना तसेच त्याच्या कुटुंबियांना औसरकर यांच्याकडून धमक्या आणि मारहाणीचे प्रकार घडलेले होते . मागील महिन्यात अजय अमृतलाल बोरा हे पत्नी सौ . मंजुषा व मुलगा ऋषभ व मुलगी प्रियंका यांच्या समवेत दोन दुचाकीवरून बुऱ्हानगर देवीला जात असतांना त्यांना मागून येणाऱ्या अज्ञात युवक दुचाकीस्वराने बोरा यांच्या दुचाकीला मागून जोराची लाथ मारली व तो भरधाव वेघात पसार झाला . या अपघातात अजय अमृतलाल बोरा हे जखमी झाले होते .. त्यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली आणि त्यांची या डोळ्याची दृष्टी गेली . हा अपघात नसून घातपात असावा असा आणि त्यामागे औसरकर यांचा हात असावा असा बोरा यांना संशय आहे . या जागेच्या बेकायदेशीर ताब्याप्रकरणी बोरा यांनी पोलीस ठाण्यात पुरव्या सोबत अनेक तक्रारी दिल्या आहे . पोलिसांनी अनेक गुन्हे नोंदविले आहे पण कोणतीही कारवाई केली नाही . हे सर्व प्रकार बघून बोरा कुटुंबीय पूर्णपणे उद्विग्न झाले आहे . आपणावर आणि आपल्या पतीवर अन्याय होत असुन आपलं उपजीविकेचे  साधन दरोडा टाकून हिसकावून घेतल्याने आणि आपणास कोणीच मदत करीत नसल्याने आपणास जीव द्यावासा वाटतो अशी प्रतिक्रिया मंजुषा बोरा यांनी दिली आहे . अजय अमृतलाल बोरा , सौ . मंजुषा , चि . ऋषभ आणि कु . प्रियंका बोरा यांनी सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे . नगर शहरात अशा अनधिकृत पणे बेकायदेशीर मार्गाने जागा बळकावण्याच्या प्रकारात वाढ होत असून पाठबळाशिवाय हे घडू शकत नाही असे बोरा याना वाटते आहे .