पराभवाचा भीतीने नरेंद्र मोदींनी तीन काळे कृषी कायदे माघे घेण्याची घोषणा केली – किरण काळे

मंत्री ना. थोरात प्रदेश अध्यक्ष आ. पटोलेचा नेतृवाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात उभ्या केलेल्या जनआंदोलनाचा हा विजय

देशातील काही राज्यामध्ये होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषना केली .  हा गेल्या  एक वर्षांपासून ऊन ,पाऊस आणि रक्त गोठणाऱ्या थंडीत दिल्लीचा सीमेवरच आंदोलन करणाऱ्या  देशभरातील शेतकऱ्यांचा विजय असल्याचे प्रतिपादन शहर  काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष  किरण काळे यांनी  केले .तीन कृषी कायदे मागे घेण्याचा मागणी संदर्भात महसूल मंत्री ना.  बाळासाहेब थोरात व प्रदेश अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांचा नेतृत्वाखाली नगर शहर जिल्हा काँग्रेस  कमिटीचा वतीने अनेक वेळा आंदोलंन  सत्याग्रह शहरात करण्यात आले .ऑनलाईन  किसान रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आले .देशाचा पंत प्रधानांना झुकवण्याचा काँग्रेस चा मोठा वाटा  देशाचे नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांचा नेतृत्वाखाली केलेल्या कामाचा आहे .


राज्यात ना. बाळासाहेब थोरात प्रदेश अध्यक्ष असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची सुरुवात  केली .  त्या वेळेस  महाराष्ट्रातून सर्वात मोठा दबाव सरकार वर निर्माण झाला होता .हे ना. थोरात यांचे यश असून आ. पटोले  प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर ना. थोरात यांनी घेतलेली भूमिका पुढे  नेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भूमिका लावून धरली होती.  देशाचा पंतप्रधानांना या तुघलकी निर्णया विरोधात झुकायला भाग पडणाऱ्या ना. थोरात  व आ. पटोले यांचा अभिनंदनाचा ठराव जिल्हा किँग्रेस कमिटीचा  वतीने करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली .


काळे पुढे म्हणाले कि महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्गाने जात काँग्रेस कार्यकर्त्यांनी या देशातील हुकूमशाही नेतृत्वाचा अहंकार मोडीत काढीत शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला आहे. हा गेल्या  एक वर्षापासून ऊन पाऊस वारा व रक्त गोठणार्या थंडीत दिल्लीचा सीमेवर आंदोलनं करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांचा लढ्याचा विजय आहे.  रक्त गोठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला .रस्त्यावर खिळे ठोकून त्यांना अडवण्यात आले . या अत्याचाराची  जबाबदारी  मोदी  सरकारला  टाळता येणार नाही.  कितीही मोठा अहंकारी शासनाला जनता झुकावू शकते. हे पुन्हा सिद्ध झाले आहे . या शेतकरी आंदोलन दरम्यान  शेतकरीबांधवांना अपला जीव गमवावा लागला . काही शेतकरी बांधवाना गाडीखाली चिरडून मारले गेले याची जबाबदारी मोदी सरकारला घ्यावी  लागेल आणि अन्नदात्याची माफी मागावी लागेल  अशी मागणी किरण काळे यांनी काँग्रेस चा वतीने केली.