त्या बांधकाम व्यावसायिक व भिंगारच्या गुंड प्रवृत्तीच्या महिलेवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा

शहरातील एक बांधकाम व्यावसायिक व भिंगार येथील गुंड प्रवृत्तीच्या महिलेवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई केली जात नसल्याने आरपीआयचे (गवई) युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी पोलीस अधीक्षकांना स्मरणपत्र दिले. तर सदर प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.
बांधकाम व्यावसायिक व राजकीय पक्षाची महिला पदाधिकारी यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होण्यासाठी भिंगारदिवे यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र सदर गुंड प्रवृत्तीच्या महिलेच्या दबावापोटी पोलीस गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत आहे. तक्रार अर्जाची दखल घेण्यात आलेली नसून, पोलिस प्रशासन याबाबत उदासीनता दाखवत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तर सबंधित व्यक्तींपासून जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे स्मरणपत्रात म्हंटले आहे. त्वरीत त्या बांधकाम व्यावसायिक व राजकीय पक्षाची महिला पदाधिकारीवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार भिंगारदिवे यांनी केली आहे.