दरोड्याच्या तयारीतील तिघांना अटक .

दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना शनिबी शिंगणापूर पोलिसांनी कांगोणी शिवारात पाठलाग करून अटक केली . सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे याना नगर औरंगाबाद रस्त्यावरीळ शिंगणापूर फाट्याजवळ चांदेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच ते सहा व्यक्ती संशयास्पद फिरत असल्या ची माहिती प्राप्त झाली . करपे पोलीस पथकासह तेथे गेले . पोलीस पाहून आरोपींची पळ काढला . मात्र पोलिसांनी पाठलाग केला . यावेळी अमोल जालिंदर काळे (वय २६ रा राजेवाडी , जामखेड ) , किरण रावसाहेब काळे (वय २५ मिलिंदनगर ,जामखेड ), विकी मिलिंद घायतडक (वय ३१ आरोळे वस्ती ,जामखेड ) या तिघांना अटक केली . अंधाराचा फायदा घेऊन दोघे पळून गेले .