दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने बक्षीस वितरण…

अहमदनगर येथील पाईपलाईन रोड वरील दहीवाळ सराफ खरवंडीकर यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सोन्याची नथ, चांदीचे नाणे,आणि पैठणी अशा स्वरूपाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. दिवाळीच्या दरम्यान ज्या ग्राहकांनी दहिवाळ सराफ या दालनातून सोने खरेदी केले. अशा ग्राहकांना विजेते काढण्यात आले. दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त या लकी ड्रॉ सोडतीचा कार्यक्रम नगर शहरातील पाईपलाईन रोडवरील यशोदानगर कमानी समोरील दालनात करण्यात आले. दहिवाळ सराफ यांच्या पाचवा वर्धापन दिनानिमित्त गायनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. दहिवाळ सराफ यांच्या दालनामध्ये विविध आकर्षक तसेच विविध डिझाईन मध्ये दागिने उपलब्ध आहेत. दहिवाळ सराफ खरवंडीकर या दालनामध्ये घट न होणारे हॉलमार्कचे दागिने उपलब्ध आहेत. गेल्या पाच वर्षात नगरकरांनी  दिलेल्या प्रतिसादा बद्दल दहिवाळ सराफचे संचालक नवनाथ दहिवाळ, सचिन दहीवाळ, नितीन दहीवाळ यांनी नगरकरांचे यावेळी आभार मानले.तसेच मकर संक्रांतीनिमित्त जोडवे महोत्सव सुरू असल्याची माहिती यावेळी संचालकांनी दिली.

यावेळी अरुणा दहीवाळ, शितल दहीवाळ, पूजा दहीवाळ उपस्थित होते.सोन्याची नथ सुनीता दरेकर, वैशाली कोतकर, अर्पिता गांधी, छाया घोडके बिडवाई GR यांनी जिकंले तर चांदीची नाणी ,सविता आढाव, मोनिका घोडके, अंजली शेरकर, आस्था कोतकर, वरद शिपणकर आणि पैठणी,मनीषा गर्जे, भूषण तितर, शिला शिरसाठ, सविता रोडे श्रीनिवास कोडम यांनी जिकंले आहे.