नगरचे विजयकुमार देशमुख यांनी पटकावला सूर्यपुत्र टाईटल अवॉर्ड

अखिल भारतीय योग महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या चौथ्या ऑल इंडिया (एबीवायएम) सूर्यनमस्कार स्पर्धेत नगरचे माजी सैनिक विजयकुमार लक्ष्मण देशमुख यांनी वयाच्या 62 व्या वर्षी सर्वाधिक सूर्यनमस्कार करुन राष्ट्रीय पातळीवर सूर्यपुत्र टाईटल अवॉर्ड पटकाविला.
या स्पर्धेसाठी सपुर्ण भारतातून पाचशेपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील 29 स्पर्धक तीन फेरी पुर्ण करून अंतिम फेरीत पोहचले होते. त्यापैकी आठ जणांना सूर्यपुत्राचा बहुमान मिळाला. घराघरात सकाळी सूर्यनमस्काराने दिनक्रमाची सुरुवात व्हावी व नागरिक निरोगी व सदृढ राहण्यासाठी त्यांच्यामध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजयकुमार देशमुख यांनी हा पुरस्कार पटकाविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.