नगर पुणे शटल एक्स्प्रेस रेल्वे सुरु करा यासाठी जागरूक नागरिक मंचाचे पुन्हा एकदा रेल्वेला अल्टिमेटम

 नगर पुणे रेल्वे प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी दौंड ला कॉड लाईन टाकून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरी देखील नगर पुणे शटल एक्स्प्रेस सुरु करण्यात येत नाही . आणि नगर आष्टीचा रेल्वे मार्ग पूर्ण होऊन अवघा महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच आष्टी ते नगर आणि पुढे आष्टी मुंबई अशी रेल्वे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. अशा अफवाची सर्वत्र चर्चा आहे. हे खरे आहे की खोटे हे माहीत नाही परंतु नगर पुणे शटल एक्स्प्रेस तात्काळ सुरु करावी या मागणी साठी जागरुक नागरिक मंचाच्या वतीने रेल्वेला पुन्हा एकदा एक महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी मंचाचे सरचिटणीस कैलास दळवी , प्रा सुनील कुलकर्णी  , दत्ता गायकवाड , प्रकाश कुलकर्णी ,  अभय गुंदेचा , प्रा कसबे, श्रीमती सुरेखा सांगळे , श्रीमती छाया चंगेडिया,  सौ. मयुरी मुळे  उपस्थित होते.
येत्या एक महिन्यात जर नगर पुणे रेल्वे सुरु झाली नाही तर आपण रेल रोको आंदोलन करू तसेच मुंबई येथे जाऊन व्ही स्टेशनवर ए जी एम च्या दालनात जागरूक नागरिक मंचाचे कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करतील असा इशारा सुहास मुळे यांनी दिला.
नगर पुणे रेल्वे कधी सुरु होणार याबाबत रेल्वे प्रशासनाकडे लवकरच असे उत्तर आहे. पण कधी असे जर विचारले तर रेल्वेचे अधिकारी मिठाची गुळणी धरून बसलेले दिसतात. दौंड कॉड लाईन टाकण्यात आली त्यामुळे आता सध्याचा रेल्वे प्रवास हा नगरहून पुण्यापर्यंत अवघ्या अडीच तासावर आला . दररोज नगर पुणे रस्त्यावरून अडीच लाख वाहने धावतात. सुपे येथील टोल नाक्यावर ही आकडेवारी उपलब्ध आहे. आणि नगर रेल्वेने नगर पुणे किंवा शिर्डी मुंबई अशी जरी रेल्वे सुरु केली तरी रेल्वेला दरमहा  ५ ते साडेपाच कोटींचा महसूल मिळू शकतो अशी परिस्थिती असताना अधिकारी गप्प का रेल्वे मंत्रालय खासदार काय करतात हा खरा प्रश्न आहे. असे सुहास मुळे यांनी म्हंटले आहे.