नगर मध्ये दिव्यांग तपासणी ,प्रमाणपत्र वाटप शिबीर .

अहमदनगर -जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हयात प्रथमच आमदार संग्राम जगताप यांचा मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयाचा वतीने कै.वै.पं. गंगाधर शास्त्री गुणे आयर्वेद रुग्णालय येथे शुक्रवार दि. ३ रोजी जिल्हातील दिव्यांगांची तपासणी करून ऑनलाईन प्रमाणपत्राचे लगेच वाटप शिबीर आयोजन केले आहे . तरी जिल्हातील तसेच शहरातील जास्तीत जास्त जास्त दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल चे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे प्रदेश उपाध्यक्ष महेश बारगजे यांनी केले आहे . 
या शिबिरात अस्थिव्यंग ,अधू , मतिमंद , मूकबधिर ,कर्णबधिर ,अशा सर्व प्रकारचा दिव्यांगांची तपासणी होणार असून ज्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र काढायचे आहे त्यांनी आधार कार्ड , रेशनकार्ड , २ पासपोर्ट फोटो आणावे तसेच आधार कार्ड व रेशन कार्ड ची झेरॉक्स प्रत सोबत ठेवावी लागणार आहे . या शिबिरात अपंग व्यक्तींसाठी असणाऱ्या शासकीय योजने संदर्भात संबंधित अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन केले जाणारा आहे . तसेच अपंग व्यक्तींचे अधिकार हक्क योजने संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे .  तरी या दिव्यांग शिबिराचे जास्तीत जास्त दिव्यांगांनी सहभाग घ्यावा असे आव्हान अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेल चे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे प्रदेश उपाध्यक्ष महेश बारगजे राष्ट्र्रवादी काँग्रेस  विध्यार्थी सेल चे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, कार्याध्यक्ष बाबा शेख , उपाध्यक्ष शेखर बोत्रे ,शहर उपाध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी केलं आहे .