नेवाशात दोन दरोडे एक घरफोडी .

नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे  दोन ठिकाणी दरोडेखोरांनी ५० हजारांची रोकड व  सोन्याचे डाग दागिने लुटले . हि घटना बुधवारी (दि ५) पहाटे ३ वाजेचा सुमारास घडली . याच दिवशी पहाटे सुरेगाव (गळनिंब) येथेही घर फोडी होऊन सुमारे डिड लाखाचा ऐवज लंपास झाला . पुणतगाव – पाचेगाव रस्त्यालगत अशोक कारखान्याचे माजी संचालक मछिंद्र वाकचौरे व त्यांचे पुतणे प्रसाद वाकचौरे यांचा घरी पहाटे तीन चा सुमारास सहा जणांनी दरोडा टाकला चाकूचा धाक दाखवून महिलांचा अंगावरील दागिने  व तीन हजारांची रोकड असा पंचवीस ऐवज लुटला. मछिंद्र वाकचौरे यांचा घरातून ३ तोळे सोने व १७ हजार लुटल्याचे प्रसाद वाकचौरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे .