नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघात नगर तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ मंगळवार दि.21 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता गावातील नवनाथ विद्यालयाच्या मैदानात होणार असून, या स्पर्धेत नगर तालुक्यातील हॉलीबॉल संघांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी शिवाजी खरात व युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी केले आहे.
ही स्पर्धा नगर तालुक्यातील खेळाडूंसाठी असून, खेळाडूंचे वय 15 ते 29 वर्षा पर्यंन्त असणे आवश्यक आहे. प्रवेशिका विनामुल्य असून, सोमवार दि. 20 डिसेंबर पर्यंत हॉलीबॉल संघांनी प्रवेशिका पाठवाव्यात. खेळाडूंनी स्पर्धेला येताना आधार कार्ड आनण्याचे सांगण्यात आले आहे. नगर तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा रंगणार असून, स्पर्धेत सहभागी होणार्‍या स्पर्धकांना शासनाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. विजयी व उपविजयी संघास स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, युवा मंडळाचे सचिव प्रतिभा डोंगरे आदी प्रयत्नशील आहेत. अधिक माहितीसाठी व संघाच्या नांव नोंदणीसाठी 9226735346 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.