पंचायत समिति, नगर परिषद,जिल्हा परिषद च्या निवडणूक समाजवादी पार्टी स्वबळावर लढविण्याच्या तैयारित – समाजवादी पार्टीचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अजीम राजे.    

समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने प्रदेश अध्यक्ष अबु आजमी यांच्या अध्यक्षते खाली मुंबई येथे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी आगामी होणाऱ्या अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील पंचायत समिति, नगरपरिषद व जिल्हा परिषद च्या निवडणूका समाजवादी पार्टीतर्फे स्वबळावर लढवण्याच्या तयारी करण्यात आली त्यावेळी अहमदनगर दक्षिण जिल्हा च्या  पूर्ण आराखडा तय्यार करुण समाजवादी पार्टी प्रदेश अध्यक्ष आमदार अबु आसिम आजमी यांच्या कडे दक्षिण जिल्हा अध्यक्ष अजीम राजे यांनी दिले असुन त्यावर लवकरच निर्णय घेऊन  निवडणूक लढणार असल्याचे असे अबु आसिम आजमी यांनी सांगितले त्यावेळी उपस्थित प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी, महासचिव जुल्फिकार आजमी, राउफ शेख, उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा च्या जिल्हाअध्यक्ष, महानगर अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते अजीम राजे म्हणाले की येणाऱ्या पंचायत समिती नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पहिल्यांदा समाजवादी पार्टी तर्फे उमेदवार उभा राहुन समाजवादी पार्टीचे उमेदवार या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत ठिकठिकाणीं  वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासह पार्टी चे नगरसेवक यांचे द्वारे जिल्ह्यामध्ये समाजवादी पार्टीची सभा लाऊन  निवडणूक लढविणे सोपे जाणार असे अजीम राजे म्हणाले.