परीटवाडी शिवारात डोक्यात दगड घालून वृद्धेचा

कर्जत—- तालुक्यातील  परीटवाडी शिवारात एका वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला . गुरुवारी सकाळी सातच्या पूर्वी परीटवाडी शिवारात एका ज्वारीच्या पिकात कमलाबाई चांगदेव वाघ ( वय ७५ , रा . परीटवाडी ) यांचा मृतदेह डोक्यात दगड घातलेल्या अवस्थेत मिळून आला . याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात रामदास चांगदेव वाघ यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला . घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल , उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव , पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव , सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित , दिनकर मुंडे यांनी भेट देऊन तपास सुरू केला .