पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागात पाठयपुस्तके
महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३-२४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागामध्ये पाठयपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे. हि पुस्तके या वर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमासाठी पथदर्शी प्रकल्पातंर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत. त्यांचा वापर कशाप्रकारे करावा, या संदर्भातील उद्बोधनसत्र मंडळाने https://www.youtube.com/c/eBalbhartil-msbt या लिंकवर बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे.