आयुष्यमान भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा
अहमदनगर ; केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना हि गरजू रुग्णांसाठी महत्वाची असून,त्या माध्यमातून तातडीने रुग्णांच्या आजाराचे निदान करता येते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा घेणे परवडत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. सावेडी भागात माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सहकार्याने आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थीसाठी कॅम्प घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक रवींद्ररविंद्र बारस्कर, नगरसेविका वंदना ताठे, महाराष्ट्र तांत्रिक मंडळाच्या स्वाती दराडे, सावेडी आरोग्य केंद्रप्रमुख शिल्पा चेलवा, मनोज तेथे, पुष्कर कुलकर्णी, निलेश जाधव, शिवा आढाव, स्वप्नील भिंगारदिवे, सुजल झुंजार आदी उपस्थित होते.