पावसाचा धमाका! दारणा, गंगापूर धरणं तुडुंब भरली
पावसाचा धमाका! दारणा, गंगापूर धरणं तुडुंब भरली, गोदावरीला नवीन जीव!
पावसाचा धमाका! दारणा, गंगापूर धरणं तुडुंब भरली, गोदावरीला नवीन जीव!
उत्तर महाराष्ट्रातला पाऊस अखेर जोर धरू लागला आणि त्याचा परिणाम दिसू लागला आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर गेले २४ तास म्हणजेच आज सकाळी ६ पर्यंत तब्बल १५० मिमी पाऊस पडला. यामुळे दारणा आणि गंगापूर धरणं तुडुंब भरली आहेत आणि गोदावरी नदीचा पुरगंगा अवतार झाला आहे.
दारणा धरण (क्षमता : ७ टीएमसी) दुपारी दीडच्या सुमारास भरलं आणि लगेच ११०० क्युसेक वेगाने पाणी नदीत सोडण्यात आलं.
गंगापूर धरण आता ५०% क्षमतेवर आहे आणि उद्या सकाळी ९ च्या सुमारास ओव्हरफ्लोचं पाणी सोडलं जाणार आहे.
मुकणे धरणात यंदा लवकरच २.५ टीएमसी पाणी साठलं आहे.
भंडारदरा २०% वरून ३०% आणि निळवंडे ३२% पाणीसाठा गाठलं आहे.
उसाच्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर!
गोदावरी कालव्यात आधीच ओव्हरफ्लोचं पाणी वाहत होतं, आता धरणातून ओव्हरफ्लो सुरू झाल्यानं पुढील १५-२० दिवस कालवे भरून वाहतील. पावसाची साथ राहिली तर हा कालावधी थेट २-२.५ महिने वाढू शकतो.
याचा फायदा राहाता, कोपरगाव तालुक्यातील विहिरींना होईल आणि साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे –
संजीवनी
कोळपेवाडी
गणेश
संगमनेर
प्रवरा
अशोक
ज्ञानेश्वर
वृद्धेश्वर
मुळा
१५ ऑगस्टच्या आतच धरणं पूर्ण भरण्याची शक्यता आहे, त्यामुळे साखर उद्योगासाठी आणि शेतकऱ्यांसाठी यंदाचं पावसाळं भरपूर आशा घेऊन आलं आहे.
