पीठ गिरणी संघटनेच्यावतीने वीज वितरण व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

अहमदनगर शहर व उपनगर पीठ गिरणी संघटनेच्यावतीने घरगुती अवैद्यरित्य गिरणी व्यवसाय करणारांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी निदर्शने करुन  वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. तसेच पीठ गिरणी व्यवसायिकांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देण्यात यावा, अशीही मागणी जिल्हाधिकारीकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक पंडितराव खरपुडे, अध्यक्ष रामकिसन सुपेकर, उपाध्यक्ष अरुण गिरम, चंद्रकांत ताठे, अकबर पठाण, वैभव मुळे, हाजी शेख जमीर, शंकर म्हस्के आदि उपस्थित होते.

वीज वितरण मुख्य अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व पीठ गिरणी व्यवसाकयांनी नियमाप्रमाणे मनपाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन आपल्या कार्यालयाकडून वीज मीटर घेतले आहे. आजपर्यंत नियमित वीज बील भरत आहोत. परंतु गेल्या काही वर्षांपासून अवैद्यरित्या घरगुती (घरघंटी) व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी. त्यांनी कुठल्याही प्रकारची मनपाची परवानगी घेतलेली नाही किंवा व्यवसायिक वीज मीटर घेतलेले नाही. या सर्वांची तपासणी करुन जेथे कुठे असे अवैद्यरित्या पीठ गिरणी सुरु असेल त्यांच्यावर कारवाई करावी. पीठ गिरणी चालकांचे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असल्यामुळे बेकायदेशिररित्या पीठ गिरणी व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई करावी.

तसेच जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमची संघटना पीठ गिरणी चालक, मालक व कारागिर यांच्यासाठी काम करते. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन होत आहे. या कालावधीत अनेक व्यवसायिकांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला आहे. परंतु या नियमावलीत पीठ गिरणीचा कुठलोही उल्लेख नसतो. हा व्यवसाय सुद्धा नागरिकांची दैनंदिन प्राथमिक गरजेपैकी एक आहे. कोरोना काळातही जीवाची परवा न करता ग्राहकांची सेवा केली आहे. तरी आपल्या येणार्‍या नियमावलीत पीठ गिरणीचा समावेश अति अवश्यक सेवेमध्ये करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

यावेळी मुश्ताक शेख, रविंद्र शिंदे, अल्ताफ शेख, बजरंग गव्हाणे, जावेद पठाण, गणेश अडसरे, देशमुख मेजर, सय्यद वायल, प्रविण देशमुख, विरेंद्र शिंदे आदि उपस्थित होते.