पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील कार्यकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विचार मंचच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन

 नगर – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीचे निवेदन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विचार मंचच्यावतीने जिल्हा पोलिस उपाधिक्षक (गृह) अजित कातकडे यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेविका शारदाताई ढवण, प्रा.शरद धलपे, ज्ञानेश्वर तागड, निशांत दातीर, अशोक भांड, मयुर फणसे, प्रविण गवळी, राजेंद्र तागड, अनिल ढवण, सुनिल ढवण, संतोष गावडे आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.

     जिल्हा पोलिस अधिक्षक यांचे नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रोफेसर कॉलनी ते यशोदनगर येथे मिरवणुक काढण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी रितसर तोफखाना पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली होती. तोफखाना पोलिस ठाण्याचे निरिक्षक मधुकर साळवे यांनी सर्व पदाधिकार्‍यांशी मिरवणुकीबाबत पूर्व बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचे तंतोतंत पान करण्यात आले. शिवाय मिरवणुकीदरम्यान पोलिसांचाही बंदोबस्त होता.

     दरम्यान रात्री 10 वाजेण्याच्या सुमारास पाईपलाईन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर हल्ला झाल्याचा बनाव करुन कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झालेले सर्व मुले ही शिक्षण घेत आहेत, त्यांच्यावर यापुर्वी कोणाही गुन्हा दाखल नाही. रात्री 10 पर्यंत बंदोबस्तातील पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुक संपेपर्यंत हजर असतांना कुठलाही असा प्रकार घडलेला नाही.

     तरी याबाबत खात्री करुन तरुणांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याचा योग्य तपास करुन न्याय द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.