पैशाच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ .

राहुरी — न्यायालयीन कामकाजासाठी माहेर वरून पैसे आणल्यानंतर  पुन्हा वैद्यकीय उपचारासाठी  माहेर वरून दीड  लाख रुपये आणण्यासाठी सासर  चा लोकांनी मारहाण करून तिचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे . माहेर वरून पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला उपाशी ठेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे .अखेर सासरचा जाचाला कंटाळून पीडित विवाहित तरुणी आरती भवर हिचा आरोपी पती दिगंबर संभाजी भवर व सासू अरुणा संभाजी भवर यांचा विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
पीडित विवाहित तरुणीचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता ,विवाह झाल्यानंतर तीन वर्षांनी न्यायालयीन कामकाजासाठी माहेर वरून १ लाख रुपये आन या कारणासाठी चाल करण्यात आला होता . विवाहितेचा भावाने पैसे दिल्यानंतर काही काळाने परत वैधकीय उपचारासाठी ५० हजार रुपये आणण्याची मागणी मुळे वेळोवेळी तरुणीला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिला उपाशी पोटी ठेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला तसेच पीडितेला घराबाहेर काढून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . या बाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हनुमंत आव्हाड पुढील तपास  करत आहेत .