प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा मग चा जगात सर्वात छोटा मग दाखल

प्रसिद्ध शिल्प चित्रकार प्रमोद कांबळे यांचा मग कलेक्शन मध्ये सर्वात छोटा मग दाखल झाला आहे , प्रमोद कांबळे यांचे मग कलेक्शन प्रसिद्धच आहेत . त्यांनी जगभरात फिरून विविध प्रकारचे अडीच ते तीन हजार मग  गोळा केले आहेत . त्यांची किंमत काही कोटींचा घरात आहे .  याच मागेच जगात आता निव्वळ अडीच मिलीमीटर आकाराचा अल्युमिनियम धातूचा मग दाखल झाला आहे . हा मग अल्युमिनियम धातूत कोरीव काम करून  बनवण्यात आला आहे .

नगर मधील प्रसिद्ध मास्टर क्राफ्ट्समन लक्ष्मण जांगीड यांनी हि कलाकृती साकारली आहे . जांगीड यांनी अशाच प्रकारे छोट्या आकाराची तांदळाचा दाण्यासारखी विविध प्रकारची हत्यारे तैयार केली आहेत . प्रमोद कांबळे यांचे मग कलेक्शन पाहून भारावलेल्या लक्ष्मण जांगीड यांनी उत्स्फुर्त पने हा  अडीच एम एम आकाराचा अतिशय छोटा मग साकारला आहे . उगड्या डोळ्यांनी हा मग पाहण्यासाठी अतिशय बारीक निरीक्षण करावं लागत .   प्रमोद कांबळे यांचा मग संग्रालयात सर्वात मोठा असा १५ लिटर चा मग आहे . त्याचा आकार एक ते सव्वा फूट आहे . प्रमोद कांबळे यांचे हे मग चे कलेक्शन अतिशय आगळ वेगळं आणि आकर्षक आहेत . गुलमोहर रोड वर प्रमोद कांबळे स्टुडिओ मध्ये हि मग गॅलरी आहे . कलेविषयी प्रेम असलेले अनेक जण हे मग कलेक्शन पाहण्यासाठी तेथे आवर्जून काही काळ थांबतात