सारे जहासे अच्छा नंतर हिंदोस्ता हमारा स्मारक साकारण्याचे प्रमोद कांबळे यांचे स्वप्न

७५ व्या स्वतंत्र दिनाचा अमृत महोत्सवानिमित्त कांबळे उभारणार ७५ चौरस फुटाची उठाव भित्तीशिल्प

अहमदनगर —– भारतीय स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या  निमित्त नगर मधील महावीर कला दालनातील सारे जहासे अच्छा हे स्मारक उभारणारे प्रमोद कांबळे यांनी आता, हिंदोस्ता हमारा हे स्मारक उभारण्याचा संकल्प आणि इच्छा व्यक्त केली आहे . या स्मारकात कांबळे ७५ किलोमीटर लांबीची भिंत उभारून त्यावर भारतीय स्वातंत्र्यानंतर भारताने जे प्रगतीचे उच्चांक गाठले ,ज्या गोष्टी प्राप्त  केल्या, ज्या क्षेत्रात विक्रम प्रस्थापित केले असे प्रसंग व्यक्ती यांची शिल्पे ते साकारणार आहेत .
 या स्मारकाचे प्रतीक म्हणून प्रमोद कांबळे यांनी नगर मध्ये ७५ बाय ७५ चौरस फुटाचे विशाल भिंत उभारून उठाव भित्ती शिल्प साकारण्याचा मनोदय व्यक्त  केला  आहे . या संदर्भात  त्यांनी  प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली असून त्याचे मॉडेल कांबळे यांनी तैयार करण्यासाठी  घेतले आहे . नगर मधील पत्रकार चौकातील भगतसिह उद्यानात हि ७५ फुटी भिंत उभारण्यात येणार आहे . या भिंतीवर भारत देशाच्या  नकाशाचा बॉर्डर मागे भगवा, पांढरा आणि हिरवा हे  तीन रंग असून,  त्या तीन रंगामध्ये विविध प्रसंग उठाव भित्तिशिल्पाद्वारे साकारण्यात येणार आहे .
या प्रसंगात भारताला स्वतंत्र मिळाल्यापासून भारताने ज्या उपलब्धी प्राप्त केल्या त्याची प्रसंगारूप शिल्पे प्रमोद कांबळे साकारणार आहेत .  हे सर्व ७५ प्रसंग असतील. त्यात भारताने हॉकी, क्रिकेट , कब्बडी मध्ये मिळवलेली सुवर्ण पदके ,चंद्रावर सोडलेले यान , पाकिस्तान विरुद्ध केलेली सर्जिकल स्ट्राइक अशा विविध गोष्टी या म्युरल मध्ये येणार आहेत .देशांने  विविध क्षेत्रात घेतलेली गरुड झेप, विकसात्मक गोष्टी दाखवण्यात येणार आहेत . भारताने उद्योग, क्रीडा ,साहित्य ,कला, चित्रपट, कृषी, शिक्षण ,अर्थ ,दळणवळण ,रेल्वे ,विमान सेवा ,तसेच लष्कराने प्राप्त केलेले गैरव शाली प्रसंग यात दाखवण्यात येणार आहेत .
प्रमोद कांबळे यांचे हे मॉडेल लवकरच तैयार होईल . या प्रतिकात्मक भिंतीबरोबरच नगर मध्ये हि भिंत उभी राहिल्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना , नगर आपले वेगळेपण जपू शकणार आहे . त्याच प्रमाणे नगरचे नाव संपूर्ण भारतात गाजणार आहे . या सोबत ७५ किलोमीटर लांबीची  शिल्पकृती उभारण्याची  प्रमोद कांबळे यांची इच्छा आहे .  त्याला केंद्र आणि राज्य सरकारचे पाठबळ मिळणे अवश्यक आहे .
प्रमोद कांबळे यांनी भारतीय स्वातंत्र्याला  ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जे स्मारक साकारले ते नगर मधील स्टेशन रस्त्यावरील महावीर कला दालनात साकारले आहे , तेव्हा या दालनातील ७० बाय २० चौरस फुटाची भिंत कांबळे यांनी चित्र रेखाटून सजवली होती .त्यात त्यांनी भातरतीय स्वातंत्र संग्रामात आणि नंतरचा काळात महत्वाचे योगदान  देणाऱ्या  ५०० व्यक्तीचे चित्रे  रेखाटली होती . भारतीय स्वातंत्र्याची अशा प्रकारे आगळी वेगळी आणि आठवण करून देणारे हे एकमेव स्मारक आहे .आता प्रमोद कांबळे यांनी अशाच प्रकारे ७५ किलोमीटर लांबीचे भींत साकारण्याचा विश्व् विक्रमी प्रकल्प उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे . या द्वारे प्रमोद कांबळे हे देशाप्रती आपली निष्ठा व देश  प्रेम व्यक्त करू इच्छित आहेत .