फेसबुक लाइव्ह द्वारे दहशत पसरवणाऱ्यास अटक

नगर — शहरासह उपनगरामध्ये फेसबुक लाइव्ह चा माध्यमांतून दहशत पसरवणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे . अक्षय खटावकर (रा. भिस्तबाग परिसर ,सावेडी ) असे आरोपीचे नाव आहे .

पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, बिस्तबाग परिसरामध्ये राहणार अक्षय खटावकर हा सोशल मीडियाचा माध्यमातून दहशत पसरवीत होता . सोशल मीडियाचा माध्यमातून त्याने अनेक प्रकारचे गैर कृत्य केल्याचे समोर आले आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करणे , दहशत पसरवणे ,अशी कामे तो सातत्याने करत होता . त्याच्याकडे सुरुवातीला वेडसर व्यक्ती म्हणून पहिले जात होते , मात्र पोलिसांनी त्याची माहिती घेतल्यानंतर तो असे कृत्य वेडाचा भारत करत नसून त्याला सर्व काही मान्य आहे , असे दिसून येत होते .