बसचा संप काही मिटेना

नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या एसटी संपामुळे राज्य परिवहन मंडळाची सेवा कोलमडली आहे , यात सर्वसामान्यांचे हाल होत असून हि संधी साधत ट्रॅव्हल व्यावसायिकांनी लूट सुरु केली आहे . पुण्यासारख्या मार्गांचे भाडे सातशे रुपयांपर्यंत पोहोचले आहे . तसेच ग्रामीण भागातील भाडे दुप्पट झाल्याने प्रवाशांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून  बसचा संप अजून हि काही मिटेना .
एसटीचे राज्य शासनात विलगीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे . निलंबन ,बडतर्फीची कारवाई करून देखील कर्मचारी मागणीवर ठाम आहेत . राज्यातील बहुतांश विभागातील बोटावर मोजण्याइतक्या हि बस बाहेर पडत नाहीत . त्यामुळे सेवेवर मोठा परिणाम झाला आहे . नागरिकांना घराबाहेर पडायचे असल्यास खाजगीवाहनातून  प्रवास करावा लागत आहे ,
एसटी संपाचा फायदा घेत खाजगी वाहन चालकांनी मनमानी पणे भाडेवाढ केली आहे . यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर पथक नेमण्यात आपले आहे . मात्र अद्याप कोठेही वाहनावर कारवाई होताना दिसून येत नाहीए .