पोलिसाला मारहाण करत लुटले; आठ जणांविरुद्ध गुन्हा

मुख्यालयात नेमणूक असलेले अदिनाथ दिनकर शिरसाठ (रा. आष्टी जि. बीड) असे लुटमार झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी सहा जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिस कर्मचारी शिरसाठ हे त्यांच्या दुचाकीवर चांदणी चौकातून जात असताना महालक्ष्मी मंदिराच्या समोर दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून त्यांचा व जाधव यांचा वाद झाला. या वादात आठ जणांनी पोलिस कर्मचारी शिरसाठ यांना मारहाण केली. त्यांच्याकडील 20 हजार रूपये व मोबाईल काढून घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.