बहुमानाचा ”भारतरत्न पं.भीमसेन जोशी” पुरस्कार श्री.विश्वास जाधव यांना जाहीर

बहुमानाचा ”भारतरत्न पं.भीमसेन जोशी” पुरस्कार श्री.विश्वास जाधव यांना जाहीर..
सरगमप्रेमी मित्र मंडळ नगरचे संस्थापक सदस्य, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे रजिस्ट्रार आणि उस्ताद गुलाम रसूल खाॅं साहेब यांचे गंडाबंधित शागीर्द मा.श्री.विश्वास जाधव यांना “भारतरत्न पं. भीमसेन जोशी” हा सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
     श्री.विश्वास जाधव हे नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून असिस्टंट रजिस्ट्रार पदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांची अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळाचे रजिस्ट्रार पदावर नियुक्ती करण्यात आली. त्या माध्यमातून हिंदुस्तानी अभिजात संगीताचा प्रचार आणि प्रसाराचे मोठे काम त्यांनी केलेले आहे. ‘तबला’ हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय असून अनेक तबला साधकांना सुद्धा त्यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
     हा पुरस्कार त्यांना दि.१६ जून २०२३ रोजी आयोजित १० व्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत महोत्सवामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
     पुणे येथील “कलाश्री संगीत मंडळ” तसेच “दी औध सोशल फौंडेशन” यांनी हा महोत्सव दि. १६, १७, १८ जून २०२३ रोजी पं.भीमसेन जोशी कलामंदिर औंध, पुणे येथे आयोजित केलेला आहे.
     श्री.विश्वास जाधव यांचे तमाम संगीत रसिकांकडून तसेच सरगमप्रेमी मित्र मंडळ नगर परिजनांकडून मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे..