बांधावर ड्रगनफूड लावा ,अर्थीक प्रगती करा व बांधावरून होणारे वाद टाळा – प्रा. सचिन गायवळ

सेंद्रिय फळबाग लागवड

जामखेड – तालुक्यातील सोनेगाव येथील शेतकरी प्रा. सचिन गायवळ यांनी आपल्या शेतीच्या बांधावर २४०० ड्रगनफूडची लागवड सहा महिन्यापूर्वी केली आहे. ड्रगनफूडसाठी पाणी कमी लागते, वेलीला काटे असल्याने जनावरे खात नाही त्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही. अखर्चीक पिक असून वर्षभरात त्याला फळे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ड्रगनफूडची लागवड करून अर्थिक प्रगती करा असा संदेश दिला आहे.

तालुक्यातील सोनेगाव येथील शेतकरी प्रा. सचिन गायवळ यांना वडीलोपार्जीत खडकाळ शेती असून ती पावसावर अवलंबून आहे. आता तेथे लिंबोणी लावली असून बोर घेऊन ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले जात आहे. तसेच लिंबोणीमध्ये पावसाळ्यात तुर, हरभरा असे पिके घेतली जात आहे. शेतीच्या चारही बाजूंनी कंपाऊंड नसल्याने जनावरामुळे पिकांची नुकसान होते. यासाठी त्यांनी ड्रगनफूड लागवड बाबत आठ महिन्यापूर्वी माहिती घेतली व लागवडीचा निर्णय घेतला.
 प्रा. सचिन गायवळ यांनी शेतीच्या कंपाऊंडसाठी पाच फुट उंचीचे सिमेंट खांब आणून रोवले. व रेड रेड जातीचे २४०० रोपे ६० रूपये दराने आणली एक ते दिड फुट अंतरावर सिमेंट खांबाच्या दोन्ही बाजूंनी बांधावर लागवड केली. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन करून घेतले. ड्रगनफूड वेलाची वाढ होणार असल्याने दोन सिमेंट खांबाच्या एक फुट अंतरावर तार लावली यामुळे वेलाची वाढ होईल तसेच वेलाची वाढ होताना फांद्या प्रमाणे फुटणारे शेंडे काढून त्याचे रोपे तयार केले आहे.
ड्रगनफूडची झाडे सहा महिन्याचे झाली असून दोन फूट उंचीचे झाले असून वेलीला काटे आले आहे त्यामुळे जनावरे खात नाही व शेतीला कुंपन झाले आहे यामुळे शेतातील पिकाचे नुकसान टळते आहे. या फळबागेला आठवड्यातून एकदा तासभर ठिबकने पाणी दिले जात आहे. उन्हाळ्यात पाणी नाही दिले तरी चालते तसेच वर्षभरात फळे येतात यामुळे शेतकऱ्यांची अर्थिक प्रगती होते.
शेतकरी प्रा. सचिन गायवळ म्हणाले, ग्रामीण भागात शेत पडीक राहतील पण बांधावरून सातत्याने वाद होतात हे टाळण्यासाठी आपल्या बांधावर ड्रॅगनफुड लावा त्यामुळे जनावरापासून पिकाचे नुकसान होणार नाही व कुंपन होईल. ड्रगनफूड शरीरातील पेशी वाढण्यास मदत होते त्यामुळे या फळाला सहज बाजारपेठ उपलब्ध होते व शेतकऱ्यांची अर्थिक प्रगती होईल केंद्र सरकारने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले असून यासाठी अर्थिक निधीची तरतूद केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला जोड म्हणून फळबाग लागवड करावी यासाठी शासनाच्या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन केले.