भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सौ.गीता उमेश गिल्डा यांची निवड.

नगर- महिला मोर्चा भाजपा महाराष्ट्र प्रदेश  अध्यक्षा  सौ.उमाताई गिरीष खापरे यांनी भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सौ.गीता उमेश गिल्डा यांची नुकतीच  निवड केली असून या निवडीचे पत्र त्यांना कार्यकारणीच्या प्रभारी उपाध्यक्षा सुरेखा विद्ये व महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.अंजली वल्लाकट्टी यांच्या उपस्थितीत  शिर्डी येथे कार्यकारणीच्या बेठकित देण्यात आले.यावेळी प्रिया जानवे उपस्थित होत्या.

सौ.गीता गिल्डा यांच्या कार्याचा अनुभव दांडगा असून यापूर्वी त्यांनी शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष कार्य केले आहे.तसेच महिला आघाडी उपाध्यक्ष व सरचिटणीस पदी उत्तम कामगिरी केली आहे.तसेच इंग्लिश मेडियम प्रिन्सिपल असोसीएशन पाच वर्ष अध्यक्ष व सचिव म्हणून हि कार्य केले आहे,रोटरी इनरव्हील क्लब व प्रियदर्शनी रोटरी चे अध्यक्ष पदी केलेले कार्य उल्लेखनीय आहे,राजस्थानी बहु मंडळाच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी सामजिक संस्थांना भरीव मदत केली आहे .सध्या  त्या अनेक सामाजिक संस्थावर कार्यरत असून त्यांच्या या निवडी  बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.