मनपाच्या स्थायी समिती साठी इच्छुकांची मोर्चेबांधणीला सुरुवात

नव्याने होणार सदस्यांची नियुक्ती

अहमदनगर – महापालिकेची आर्थिक चावी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीतील ८ सदस्यांची ३१ जानेवारीला मुदत संपत आहे . रिक्त जागेवर नियुक्तीसाठी सर्वच पक्षातील इच्छुक नगर सेवकांनी प्रयत्न सुरु केले आहेत  . स्थायी समितीत १६ सदस्य आहेत . सध्या समिती राष्ट्रवादी शिवसेना प्रत्येकी ५ , भाजप ४ ,काँग्रेस व बसपा प्रत्येकी १ , असे संख्याबळ आहे . त्यातील राष्ट्रवादीचे डॉ सागर बोरुडे , प्रकाश भागानगरे , परवीन कुरेशी , शिवसेनेचे श्याम नळकांडे , व विजय पठारे , भाजपचे मनोज कोतकर , व सोनाबाई शिंदे तर कॉग्रेस चा सुप्रिया जाधव , अशा आठ सदस्यांचा दोन वर्षाचा कार्य काल संपत आहे . नवीन ८ सदस्य नियुक्तीसाठी महापौर महासभा बोलवितात . पक्षाचे गट नेते महासभेत समितीवर नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांची नावे महापौरणकडे देण्यात येतात , त्यानंतर त्या नियुक्त होतात . महापालिकेत सध्या शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस या टीएन पक्षाची महाविकास आघाडी आहे . संख्याबळानुसार त्यांनी आप आपसात पदे वाटून घेतली आहेत . राष्ट्रवादीचे अविनाश घुले हे सध्या स्थायी समितीचे सभापती आहेत . घुले यांचाही १ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे त्यामुळे ८ सदस्यातून एक सभापती निवडला जाणार आहे . हे पद राष्ट्रवादी चे  असल्याने राष्ट्रवादीचा सदस्य सभापती होणार हे निश्चित आहे . कुमार सिंह वाकळे  आणि विनीत पाऊलबुद्धे या पदासाठी इच्छुक आहेत .