भारतीय लष्कराचे विमान कोसळले , सी डी एस बिपीन रावत जखमी .

भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर तामिळनाडूचा कुन्नुरमध्ये कोसळले आहे , या हेलिकॉप्टर मध्ये   सी डी  एस बिपीन रावत सह १४ जण प्रवास करत होते , घटना स्थळी ४ जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून एकूण ११ जणांचा मृत्यू या दुर्घटनेत झाला आहे . खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे . दुसरीकडे जखमींना उपचारासाठी वेलिंग्टन येथील लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिपीन रावत यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीसंबंधी माहिती देण्यात आलेली नाही.
 
वृत्तानुसार, तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या Mi- 17V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं. स्थानिक देखील या बचावकार्यात सहभागी झाले होते. अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत होत्या.