मंडलाधिकाऱ्याचा डोळ्यात चटणी टाकणाऱ्यास अटक .

मंडलाधिकाऱ्याचा डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना शिवी गाळ, दमदाटी  करणाऱ्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली .  हसीन भाई चांद पठाण ( रा. अमीर मळा ,बुऱ्हानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . त्याला न्यायालयासमोर हजर केले असता ,न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अवैधरित्या खडी वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मंडलाधिकारी जीवन सुतार यांचा डोळ्यात आरोपी हसीन भाई व त्यांचा मुलगा हनीफ पठाण यांनी मिरचीपूड टाकून शिवीगाळ दमदाटी केली होती . कापूरवाडी ते वारूळवाडी रस्त्यावरील बुऱ्हाणनगर येथे हि घटना घडली .
या प्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात   दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे ,पर्यावरण संरक्षण अधिनियम आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गुन्हा घडल्यानंतर हसीन भाई पळून गेला होता . तो अमीर मळा  येथे आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सतीश सिरसाठ यांना मिळाली होती , पोलीस उपाधीक्षक अजित पाटील ,सहायक निरीक्षक शिरीषकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिरसाठ यांचा पथकाने त्याला अटक केली .