महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय खांदवे यांचा वाळकी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी संजय आसाराम खांदवे यांची नियुक्तीझाल्याबद्दल त्यांचा वाळकी ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. यावेळी फिरोज शेख उपस्थित होते.
विजय भालसिंग म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात संजय खांदवे तळमळीने कार्य करीत आहे. शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. खांदवे वाळकी गावाचे सुपुत्र असून, विद्या दानाच्या पवित्र कार्याने समाज घडविण्याचे कार्य ते करीत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यात काम करण्याची संधी मिळाली असून, ते संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना संजय खांदवे यांनी विद्यादानाचे पवित्र कार्य करणार्‍या शिक्षकांचे अनेक प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबीत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय खांदवे जिल्हा परिषद शाळा कामठी (ता. श्रीगोंदा) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.