महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आठरे कार्यतत्पर -आ. संग्राम जगताप

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे संचलित यशस्विनी सामाजिक अभियानच्या अहमदनगर जिल्हा समन्वयकपदी रेशमाताई आठरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड, साधना बोरुडे, नैना शेलार, सुजाता दिवटे, सुनिता गुगळे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी रेशमाताई आठरे कार्यतत्पर असून, महिला राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे विविध प्रश्‍न सोडविले आहेत. महिलांचे संगठन करुन महिला सक्षमीकरणाला एक प्रकारे त्यांनी उत्तम चालना दिली आहे. यशस्विनी सामाजिक अभियानच्या माध्यमातून त्यांना महिलांसाठी काम करण्याची संधी मिळाली असून, त्या उत्तमप्रकारे या पदाची जबाबदारी सांभाळतील अशी आशा व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना रेशमाताई आठरे यांनी महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. महिलांना राष्ट्रवादीत सन्मानाचे स्थान मिळत असल्याने अनेक महिला पक्षाशी जोडल्या गेल्या आहेत. तर समाजकारण ध्येय ठेऊन सुरु असलेल्या कार्यामुळे महिलांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते, अविनाश घुले व अभिजीत खोसे यांनी आठरे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.