माजी आमदार भानुदास मुरकुटेंचा 21-0 ने विजय

श्रीरामपूर— तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या लोकसेवा मंडळाला सर्व 21 जागांवर विजय मिळाला . त्यामुळे कारखान्यावर पुन्हा मुरकुटे यांचाच झेंडा फडकला . या निवडणुकीत भानुदास मुरकुटे यांनी त्यांची सून डॉ . वंदना मुरकुटे व शेतकरी संघटनेचा पराभव करत 35 वर्षांपासूनची सत्ता राखली . भानुदास मुरकुटे यांच्या विरोधातील पॅनेलमध्ये त्यांच्याच सून डॉ . वंदना मुरकुटे लढत असल्याने ही निवडणूक राज्यात औत्सुक्याचा विषय ठरली होती . या निवडणुकीतील मतदान प्रक्रिया काल ( रविवारी झाली . श्रीरामपूर येथील थत्ते मैदानाजवळ असलेल्या गुजराती मंगल कार्यालयात आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला . रात्री उशिरा या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली.