माजी जिल्हा परिषद सदस्य सदाफुलेंचा अपघाती मृत्यू

अहमदनगर — नगर – जामखेड रोडवर निंबोडी गावच्या शिवारात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात . शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय ऊर्फ बापूसाहेब शहाजी सदाफुले ( ४६ , रा . चिचोंडी पाटील , ता . नगर ) यांचा मृत्यू झाला . सदाफुले हे चिचोंडी पाटील गावचे रहिवासी होते . कामानिमित्त ते मोटारसायकलने नगरकडे येत होते . जामखेडच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती इर्टिका कारने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली . यात सदाफुले गंभीर जखमी झाले . अपघातानंतर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले , मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला .