माथेफिरुंनी पेटवून दिल्या दुचाकी

जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात दुचाक्या पेटूवून देण्याची घटना घडली आहे .  अज्ञातांनी चार दुचाकी गाड्या पेटवून दिल्याने शहरात सकाळी एकच खळबळ उडाली. श्रीगोंदा येथे हे जळीतकांड घडले आहे. यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा शहरातील सावरकर चौक आणि पंचायत समितीच्या परिसरातील नागरी वस्ती मध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी चार दुचाकी गाड्या पेटवून दिल्याने शहरात सकाळी एकच खळबळ उडाली. दरम्यान या दुचाकी गाड्या योनी पेटवून दिल्या? का पेटवल्या? याबाबत उलट सुलट चर्चा सरु आहे. या दुचाकींमध्ये एका पोलीस कर्मचार्‍यांच्या दुचाकीचा देखील समावेश आहे. आता नेमके रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. नेमके कोणी हे कृत्य केले याचा तपास पोलीसांनी केला तर पुढील अनर्थ टळणार आहे.