अहमदनगर जिल्ह्यात वर्षभरात साडे एकवीस हजार गुन्हे दाखल .

अहमदनगर -जिल्ह्यात सरत्या वर्षात २१  हजार ४२५ गुन्हे दाखल झाले आहेत . राज्यातील इतर जिल्ह्यांचा तुलनेत सर्वाधिक दाखल गुन्ह्यांची संख्या आहे .मागील दोन वर्षाचा तुलनेत हि संख्या जरी वाढली असली तरी  टू प्लस योजनेमुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे . अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली  , पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकारत परिषदेत ते बोलत होते . अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे   ,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके , या वेळी उपस्थित होते.
या वेळी मनोज पाटील म्हणाले कि, जिल्ह्यात ,दरोडे ,जबरी चोऱ्या ,घरफोडी ,चोरीचे गुन्हे उघडकीस आणले , अवैध धंदे , दारू , जुगार,  गांजा , अवैध शस्र , बायो डिझेल वर कारवाई केली . तसेच मोक्का ,एमपीडीए , हद्दपार ,समन्स  वॉरंट बजावणी करून फरार आरोपी पकडले ,  १  जानेवारी ते २८ डिसेंमबर २०२१ या कालावधीत जिल्ह्यात भाग ५ नुसार १२ हजार २५२ गुन्हे दाखल आहेत .  भाग सहा नुसार २६६८ , दारूबंदी चें  ३३०६ तर अकस्मात मृत्यू चे ३१९९गुन्हे  दाखल आहेत . यापैकी ७८७६गुन्हे अद्याप प्रलंबित आहेत . मागील तीन वर्षातील गुन्ह्यांपैकी एकूण ५१ हजार ७२१ गुन्हांची निर्गती केली आहे . गेल्या वर्षात ५६ ड्रॉढ्यांचे गुंज दाखल झाले त्यापैकी सर्व गुंज उघडकीस आणले आहेत . जबरी चोरीचा २७२ गुन्हे दाखल झाले त्या पैकी १४९ गुन्हे उघडकीस आणले . घरफोडीचे ७९६ गुन्हे दाखल झाले . त्यापैकी १२१ उघडकीस आले . चोरीचे  ३०९२ गुन्हे दाखल झाले त्यापैकी ७०२ गुन्हे उघडकीस आले आहेत .
वर्षभरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या ३४ लोकांवर गुन्हे दाखल आहेत या मध्ये १०३ आरोपी पकडले  आहेत . त्यान्चाताब्यातुन ४३ गावठी पिस्तूल ६७ जिवंत काडतूस ,४२ तलवारी , ४  कोयते , ११ सुरे , १ गुप्ती जप्त केली आहे .  मागील वर्षी २०२० मध्ये १७८ आरोपी जेरबंद केले  होते . ७७ शस्रे आणि ११८ जिवंत काडतुसे जप्त केली होती .