मोकाटे याचा अटकपुर्व जामीन फेटाळला

मागासवर्गीय महिलेचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्याने मोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जेऊर (ता. नगर) येथील राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. तर या प्रकरणात आरोपीवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आले आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या मोकाटे यांच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन ठेवण्यात आला होता. शुक्रवारी (दि.7 जानेवारी) सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती सरकारी वकील अ‍ॅड. एम.व्ही. दिवाने यांनी दिली. पिडीत महिलेच्या वतीने न्यायालयात अ‍ॅड. सागर जाधव यांनी बाजू मांडली तर त्यांना अ‍ॅड. आकाश अकोलकर, अ‍ॅड. ज्ञानेश्‍वर फटांगरे यांनी सहकार्य केले.