रस्त्याचे डांबरीकरण करण्याची अंध व्यक्तींनी केली मागणी.

नगर शहरातील गांधीनगर मेनरोड रस्ता ते बोल्हेगाव पर्यंतचा रस्त्याचे डांबरी करण  करण्याची  मागणी बोल्हेगावतील अंध व्यक्तींनी केली आहे , सुनील माधव शेवंते व सुहास सखाराम उल्हारे या व्यक्तीची नावे असून ते उभा मारुती रोडे चौभे कॉलनी येथे  राहतात . या अंध व्यक्तींचा खेळणी चा व्यवसाय असून ते खेळणी विकण्यासाठी शहारातील विविध भागात पायी फिरत असतात.
गेल्या काही दिवसापूर्वी नगर मनमाड रस्त्यावरील  चैत्यन्य क्लासिक हॉटेल पासून बोल्हेगाव कडे जाणाऱ्या आंबेडकर चौका पर्यंत रस्त्याचे डाग डुजीचे काम झाले असून  आंबेडकर चौक ते बोल्हेगाव या  रस्त्याचे काम अपूर्ण आहे . या भागामध्ये विविध मोठं मोठ्या  सोसायट्याचे  बांधकाम  चालले असून रस्त्यावरून मोठं मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक होत असते , यामुळे हा रस्ता पूर्ण पणे खचला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व बोल्हेगाव तसेच गांधीनगर येथील रहिवास्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे .सुनील माधव शेवंते व सुहास सखाराम उल्हारे हे अंध व्यक्ती बोल्हे गावातील  चौभे कॉलनी येथे राहतात, आपला उदर्निवाह करण्यासाठी ते खेळणी विकण्याचा व्यवसाय करतात. बऱ्याच वेळा खराब रस्त्यामुळे हे अंध व्यक्ती रस्त्यात पडतात , त्यांचे हात पाय मुरगळे जातात. यांचा खेळण्या पडल्या मुळे तुटल्या जातात तसेच या परिसरात स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे विद्यालय असून शाळेतील लहान मुलांची शाळेत येताना जाताना वर्दळ चालू असते ,या रस्त्यावर विविध मंदिरे असून वयोवृद्ध पूजेसाठी मंदिरामध्ये जातात बहुतेक वेळा यांना रस्ता खराब असल्याने त्रास सहन करावा  लागत आहे .